चिपळूण रोटरीतर्फे वृक्षारोपण


चिपळूण | प्रतिनिधी |
रोटरी क्लब चिपळूण तर्फे जागतिक पर्यावरण दिन निमित्ताने रोटरी क्लब तर्फे आनंदराव पवार महाविद्यालयाच्या आवारातील डोंगराळ भागामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पिंपळ, वड,नीव,आवळा,चिंच,आंबा,जांभूळ अशी उपयुक्त झाडे लावण्यात आली.कार्यक्रमाला रोटरी अध्यक्ष प्रशांत देवळेकर,खजिनदार मनोज जैन,वैभव रेडिज, प्रसाद सागवेकर,पराग बांद्रे, प्रोजेक्ट चेअरमन नितीन देवळेकर तसेच श्रीराम एज्युकेशन सोसायटी चे खजिनदार सिद्धेश लाड,संचालक सुहास चव्हाण तसेच वीर, बावधनकर हे कर्मचारी उपस्थित होते .

Exit mobile version