जिल्ह्यातील सर्व मध्यम लांब पल्ल्याच्या एसटी बसेस सुरु

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
लॉकडाऊनचे बरेचशे निर्बंध कमी झाल्यांनतर आजपासून रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्यपरिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसच्या सर्व मध्यम लांब पल्ल्याच्या बसेस सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच सर्व तालुका स्तरावरुन ते पनवेल मार्गावरील देखील फेर्‍या सुरु करण्यात आल्या असल्याची माहिती विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.
अलिबाग तालुक्यातील डेपामधून अलिबाग मुंबई मार्गावर सकाळी 6.30, 7.00, दुपारी 1.00, दुपारी 14.00, अलिबाग ठाणे मार्गावर सकाळी 6.15, दुपारी 2.30, रेवदंडा बोरीवली मार्गावर सकाळी 8.15, अलिबाग पुणे मार्गावर सकाळी 6.00, 7.30, दुपारी 2.00 तसेच अलिबाग पनवेल मार्गावर दर अर्ध्या तासाच्या वारंवारीतेने फेर्‍या सुरु करण्यात आल्या आहेत.
महाड डेपोमधून महाड बोरीवली सकाळी 5.30, 6.45, दुपारी 12.30, 1.30, 3.30, पोलादपूर बोरीवली सकाळी 9.30, महाड नालासोपारा दुपारी 12, महाड मुंबई दुपारी 3.15, महाड ठाणे सकाळी 6.30, महाड पुणे सकाळी 8.30 व दुपारी 12.30, महाड पनवेल मार्गावर सकाळी 6.00, 8.00, दुपारी 12.00. अशा फेर्‍या सुरु करण्यात आल्या आहेत.
पेण डेपोतून पेण ठाणे मार्गावर सकाळी 7.15, दुपारी 1.00, नाडसूर ठाणे दुपारी 2.15, पेण पनवेल मार्गावर दर अर्ध्या तासाच्या वारंवारीतेने फेर्‍या सुरु करण्यात आल्या आहेत. पेण खोपोली मार्गावर दर एक तासाच्या वारंवारीतेने फेर्‍या सुरु करण्यात आल्या आहेत.
श्रीवर्धन डेपोमधून श्रीवर्धन मुंबई मार्गावर सकाळी 5.00, 9.00, 11.15, सायंकाळी 4.00, दिघी मुंबई मार्गावर पहाटे 4.30, बोर्ली नालासोपारा सकाळी 5.30, 7.00, दुपारी 1.00, श्रीवर्धन बोरीवली सकाळी 8.30, 10.00, 11.00, श्रीवर्धन पुणे सकाळी 5.00, श्रीवर्धन महाड सकाळी 11.15, श्रीवर्धन माणगाव दुपारी 1.00, 2.00, सायंकाळी 6.15. कर्जत आणि खोपोली डेपोमधून पनवेल मार्गावर दर एक तासाच्या वारंवारीतेने फेर्‍या सुरु करण्यात आल्या आहेत.
रोहा डेपोमधून रोहा बोरीवली दुपारी 12.00, तळा बोरीवली 3.15, तळा मुंबई 11.30, तळेगाव मुंबई दुपारी 2.00, रोवळा मुंबई सकाळी 5.30, रोहा मुंबई सायंकाळी 6.00, रोहा खार 4.00, रोहा पनवेल मार्गावर सकाळी 7.00, 8.15, 10.00, दुपारी 12.30, 1.30, 3.00
मुरुड डेपोमधून मुरुड मुंबई मार्गावर सकाळी 6.30, दुपारी 3.30, मुरुड भांडूप सकाळी 6.00, मुरुड कल्याण दुपारी 12.30, मुरुड बोरीवली सकाळी 11.00. माणगाव डेपोमधून गोरेगाव मुंबई मार्गावार सकाळी 7.00, उंबर्डी मुंबई सकाळी 7.00, देवळी मुंबई सकाळी 10.15, माणगाव बोरीवली सकाळी 6.15, गोरेगाव बोरीवली सकाळी 8.30, 11.15, महाड बोरीवली दुपारी 2.00, म्हसळा बोरीवली दुपारी 2.45, तळा पुणे 7.00, माणगाव पनवेल सकाळी 6.15, 8.30, 10.30 तसेच दुपारी 2.30 अशा मार्गांवर फेर्‍या सुरु करण्यात आल्या आहेत.

Exit mobile version