फणसाड परिसरात वृक्षरोपण

। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
निर्सग आपला गुरु आहे, निसर्गाचे संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे.वृक्ष लागवडीतून आपला निर्सग आपण वाचु शकतो. उत्तम आरोग्यासाठी पर्यावरणाचे संतुलन राखणे आवश्यक आहे असे मत वनक्षेत्रपाल राजवर्धन भोसले हे अभयारण्यात पर्यावरण दिनानिमित्त बोलत होते.
यावेळी वनक्षेत्रपाल राजवर्धन भोसले, मुरूड प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सुर्वे, वनपाल डी. एस. सुभेदार, वनपाल यु.डी.पाटील, वनरक्षक ए. पी. परब, वनरक्षक जी. आर. दिघे, वनरक्षक व्हि. एस. मुंढे, वनरक्षक के. बी. बाकर, वनरक्षक आर. एन. इंगोले, वनरक्षक ए. पी. पाटील, वनरक्षक डी. डी. कांबळे आदी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी वड, पिंपळ, पायर, जांभूळ आदी झाडे लावण्यात आली.

Exit mobile version