• Login
Sunday, September 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबागमध्ये ‌‘मानाच्या दहीहंडी‌’त विक्रमांचे थर

Sanika Mhatre by Sanika Mhatre
September 6, 2026
in sliderhome, अलिबाग, कार्यक्रम, रायगड
0 0
0
अलिबागमध्ये ‌‘मानाच्या दहीहंडी‌’त विक्रमांचे थर
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

24 वर्षांच्या इतिहासात नऊ थरांची विक्रमी सलामी; पुरुषांत मरीआई मेटपाडा, महिलांत भोनंग पथक अव्वल

| अलिबाग | प्रतिनिधी |

जिद्द असावी तर अशी..! एक.. दोन नव्हे तर, तब्बल 21 वर्षांची मेहनत… डोक्यावर एकावर एक रचलेले नऊ थर… क्षणाक्षणाला वाढणारा तणाव… हजारो प्रेक्षकांचा कडकडाट आणि ‌‘गोविंदा आला रे‌’च्या जयघोषात पहाटे 3 वाजून 26 मिनिटांनी मरीआई मेटपाडा गोविंदा पथकाने सात थरांवर दहीहंडी फोडत अलिबागच्या दहीहंडी इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित केला. त्याआधी तब्बल नऊ थरांची विक्रमी सलामी देत या पथकाने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले. रायगडमध्ये प्रथमच नऊ थरांची सलामी देण्याचा मान मरीआई मेटपाडाने पटकावला. पुरुष गटात मरीआई मेटपाडा, तर महिला गटात भोनंग महिला गोविंदा पथकाने प्रथम क्रमांक पटकावत विजयाची मोहोर उमटवली.

शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक आघाडी पुरस्कृत आणि प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित ‌‘मानाची दहीहंडी उत्सव 2026‌’ मोठ्या उत्साहात पार पडला. 24 वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवात यंदा नऊ थरांच्या विक्रमी सलामीने दहीहंडीचा थरार आणखी उंचावला. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली चुरस पहाटेपर्यंत कायम राहिली.

मानाच्या दहीहंडीच्या पुरुष गटात मरीआई मेटपाडा पथकाने सात थर रचत दहीहंडी फोडली. विजेत्या पथकाला 2 लाख 51 हजार रुपये आणि मानाचा चषक देऊन गौरविण्यात आले. महिला गटात भोनंग महिला गोविंदा पथकाने प्रथम क्रमांक पटकावत 1 लाख 1 हजार रुपये आणि मानाचा चषक मिळवला. नऊ थरांची विक्रमी सलामी दिल्याबद्दल मरीआई मेटपाडा पथकाला प्रशांत नाईक यांच्या वतीने एक लाख रुपयांचे विशेष पारितोषिक देण्यात आले. आठ थर रचणाऱ्या कोळीवाडा गोविंदा पथकाला 50 हजार, तर सहा थर रचणाऱ्या पोहरादेवी-शास्त्रीनगर महिला पथकाला 21 हजार रुपयांचे विशेष पारितोषिक देण्यात आले.
पहाटे 3 वाजून 26 मिनिटांनी मरीआई मेटपाडा पथकाने सात थरांवर दहीहंडी फोडताच परिसर टाळ्यांच्या कडकडाटाने आणि गोविंदांच्या घोषणांनी दुमदुमून गेला. नऊ थरांची विक्रमी सलामी आणि त्यानंतर सात थरांवर दहीहंडी फोडण्याचा थरार यंदाच्या उत्सवाचा अविस्मरणीय क्षण ठरला.

दहीहंडी फुटल्यानंतर आयोजक प्रशांत नाईक यांनी विजेत्या पथकांसह सर्व सहभागी गोविंदा पथकांचे अभिनंदन केले. नऊ थरांची विक्रमी सलामी देणाऱ्या मरीआई मेटपाडा पथकाचे विशेष कौतुक करत त्यांनी गोविंदांच्या मेहनतीला, धाडसाला आणि एकजुटीला दाद दिली. महिला गटातील विजेत्या भोनंग पथकाचेही त्यांनी अभिनंदन केले. यावेळी गोविंदा, कार्यकर्ते आणि उपस्थितांनी प्रशांत नाईक यांच्यासोबत जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा केला.

यावेळी रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील यांच्यासह शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, राज्य महिला आघाडी प्रमुख तथा उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, नगराध्यक्षा अक्षया नाईक, बांधकाम सभापती प्रशांत नाईक, जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, कामगार आघाडी प्रमुख प्रदिप नाईक, अलिबाग नगरपरिषदेचे पाणी पुरवठा सभापती अनिल चोपडा, महिला व बालकल्याण सभापती डॉ. साक्षी पाटील, उपसभापती ॲड. अश्विनी ठोसर, वृषाली ठोसर, ॲड. निलम हजारे, संजना कीर, संतोष गुरव, संध्या पालवणकर, ॲड. निवेदिता वाघमारे, प्रिया वेलणकर, अजय झुंजारराव, युवराज पाटील, प्रीती झुंझारराव योजना पाटील, जमाल सय्यद, ऋषिकेश माळी, अवधूत पाटील, नागेश कुलकर्णी, सतीश प्रधान, सर्व आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रशांत नाईक मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

24 वर्षांची परंपरा, 2005 पासूनची थरांची जिद्द आणि अखेर रायगडमध्ये नऊ थरांची विक्रमी सलामी देत मरीआई मेटपाडा गोविंदा पथकाने यंदाची ‌‘मानाची दहीहंडी‌’ अक्षरशः गाजवून सोडली. पुरुषांबरोबरच महिला गोविंदा पथकांचा दमदार सहभाग यामुळे प्रशांत नाईक मित्रमंडळाची 24 वर्षांची ‌‘मानाची दहीहंडी‌’ यंदा विशेष ठरली.

2005 पासून थरांचा थरार!
मरीआई गोविंदा पथकाची स्थापना 2005 मध्ये झाली. सुरुवातीला अवघ्या 70 ते 80 गोविंदांसह सुरू झालेल्या या पथकाने त्याच वर्षी तीन एक्के लावत सात थर रचले. 2012 मध्ये माजगाव ताडवाडी आणि जय जवान गोविंदा पथकानंतर चार एक्के लावत देशात तिसरा मान पटकावण्याची कामगिरीही पथकाने केली. त्यानंतर सात थरांची परंपरा सातत्याने कायम ठेवत पथकाने आपली ओळख अधिक भक्कम केली. 2024 मध्ये प्रथमच आठ थरांचा प्रयत्न झाला; मात्र तो अपयशी ठरला. त्यानंतर जिद्द न सोडता 2025 मध्ये कर्मभूमीवर प्रथमच आठ थर यशस्वीपणे रचून उतरवण्यात आले. त्याच वर्षी दहीहंडीच्या दिवशी तब्बल तीन वेळा आठ थर रचून सुखरूप उतरणारे रायगड जिल्ह्यातील एकमेव पथक ठरण्याचा मानही मरीआई मेटपाडाने मिळवला. 2026 मध्ये पथकाने विविध ठिकाणी तब्बल 50 ते 55 वेळा सात थर, तर 8 ते 10 वेळा आठ थर यशस्वीपणे रचून उतरवले. अखेर 2 सप्टेंबर 2026 रोजी दक्षिण कोकण विभागातील पहिले नऊ थर रचून या पथकाने आपल्या कामगिरीला नवे शिखर गाठले.
80 गोविंदांपासून 300 पर्यंतचा प्रवास
मरीआई मेटपाडा गोविंदा पथकाचा विस्तार आता केवळ मेटपाड्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. पथकातील खेळाडूंची संख्या तब्बल 250 ते 300 पर्यंत पोहोचली आहे. सिद्धार्थनगर, शास्त्रीनगर, अलिबाग कोळीवाडा, वरसोली कोळीवाडा, रामनाथ, चालमाला, कुरूळ, नागाव, चौल, वायशेत, मानी भुते यांसह अलिबाग शहरातील विविध भागांतून तरुण या पथकात सहभागी होत आहेत.
अन्‌‍ रोखले गेले श्वास...!
अलिबागेत उपस्थित असणाऱ्या हजारो प्रेक्षकांनी हा थरार अनुभवला. ‌‘गोविंदा‌’च्या गजरात एक... दोन... तीन... म्हणत प्रत्येक थर उंचावत गेला. आठवा थर चढताना प्रेक्षकांचा श्वास रोखला गेला आणि नववा थर पूर्ण होताच जल्लोषाच्या आरोळ्या दुमदुमल्या. गोविंदा पथकांचे खरे किंग आम्हीच, असा दमदार संदेश या थरारक कामगिरीत मरीआई मेटपाडा गोविंदा पथकाने दिला.

Related

Tags: adv. manasi mhatreakshaya naikalibag newschitralekha patilDahi Handi festival competition sponsored by Shekapindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianupal patilonline marathi newsprashant naikPrashant Naik Friends Association Alibaug organizedPrestigious Dahi Handi Festival 2026raigadskpskp newssocial media newssocial newssupriya patil
Previous Post

टोरंटच्या मशिनरीमुळे वाट बिकट

Next Post

दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

टोरंटच्या मशिनरीमुळे वाट बिकट
sliderhome

टोरंटच्या मशिनरीमुळे वाट बिकट

September 6, 2026
पनवेल

तळोजात सहा जनावरे बेशुद्धावस्थेत

September 6, 2026
तलावात बुडून तरुणाचा मृत्यू
sliderhome

तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

September 6, 2026
पनवेल

खारघरमध्ये बीकेसीच्या धर्तीवर नवे आर्थिक केंद्र

September 6, 2026
पर्यावरणपूरक ‌‘निपुण हंडी‌’ने नवघर शाळेत गोपाळकाला उत्साहात
रायगड

पर्यावरणपूरक ‌‘निपुण हंडी‌’ने नवघर शाळेत गोपाळकाला उत्साहात

September 6, 2026
‌‘शिक्षकच समाजाचे खरे मार्गदर्शक‌’
उरण

‌‘शिक्षकच समाजाचे खरे मार्गदर्शक‌’

September 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?