आगरी बोली विनोदाची खाण -पाटील


उरण | वार्ताहर |
लेखक मच्छिंद्रनाथ काशिनाथ म्हात्रे यांनी लिहिलेल्या लॉकडाऊन मधील आगरी कथांवर आधारित असलेले शिमगचा सोंग या आगरी कथा संग्रहाचे प्रकाशन पंचायत समिती सदस्या सौ.समिधा निलेश म्हात्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे कार्यकारिणी सदस्य रायगड भूषण प्रा. एल. बी. पाटील सर हे होते. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना ते म्हणाले शिमगंचा सोंग म्हणजे आगरी बोलीचं उघडं बंब प्रभावित करणारं चित्र आहे. आगरी बोली ही विनोदाची खाण आहे. वाक्प्रचार आणि म्हणींच्या वापराने आगरी बोली ही सजलेली आहे. तीचे जतन हे नव्या पिढीने करायला हवे असेही ते म्हणाले.

आगरी भाषेच्या प्रसारासाठी शिमगंचा सोंग हा कथा संग्रह भविष्यात देखील दीपस्तंभा सारखे काम करत राहील असे मत पंचायत समिती सदस्या सौ.समिधा म्हात्रे यांनी मांडले.
लॉकडाऊनच्या कात्रीत सापडलेल्या समाजाला जगण्याचा नवा आनंद आगरी बोलीतून मिळावा याच हेतूने शिमगंचा सोंग हा कथासंग्रह लिहिला गेला आहे असे मत लेखक मच्छिंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केले. आणि हा कथा संग्रह सौ.वंदना मनोहर म्हात्रे सेवानिवृत्त मुख्याध्यापिका गोवठणे यांना सप्रेम भेट म्हणून अर्पण करण्यात आला.

सदर प्रकाशन सोहळ्यास माजी पंचायत सदस्य लवेश म्हात्रे, सिंगापूर पोर्ट जेएनपिटीचे एचआरए हेड मनोज गावंड, ग्रामपंचायत सदस्य संदेश गावंड, गणपत ठाकूर, माजी विद्यार्थी संघटना करंजा कोंढरी चे अध्यक्ष श्री.दिनेश म्हात्रे, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ.वंदना म्हात्रे, इंडिया झिंदाबाद फ्रेण्डस गृप रायगडचे अध्यक्ष रमेश थवई, नाट्य दिग्दर्शक रायगड भूषण किशोर पाटील, पुरुषोत्तम पाटील, अनंत तांडेल, डॉ. रविंद्र गावंड, गणेश खोत, बी.जे .म्हात्रे, संजय होळकर, वि रा पाटील, बळीराम पाटील, अशोक म्हात्रे, महादेव पाटील, नरेश म्हात्रे, महेंद्र पाटील, रवि पाटील, राकेश पाटील, सौ.संगिता म्हात्रे, आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर म्हात्रे यांनी केले , तर प्रास्ताविक स्नेहबंध समुह उरणचे कार्यवाहक महेंद्र गावंड सर यांनी केले. लवेश म्हात्रे, मनोज गावंड, सौ.संगिता म्हात्रे, सौ.वंदना म्हात्रे, किशोर पाटील आदी मान्यवरांनी आपले मनोगत सादर केले. आभार प्रदर्शनाचे काम संदेश गावंड सर यांनी केले.
या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन वशेणी इतिहास संपादकीय मंडळ, स्नेहबंध समुह उरण आणि इंडिया झिंदाबाद फ्रेण्डस ग्रुप रायगड यांनी केले होते.

Exit mobile version