आपत्ती व्यवस्थापन आराखडा कागदावरच; पंडित पाटील यांचा आरोप

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महाड पुर तसेच तळीये आणि सुतारवाडी-पोलादपूर दुर्घटनेनंतर प्रतिक्रीया व्यक्त करताना शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे. 2005 च्या महापूरावेळी आपत्ती व्यवस्थापन आराखडा बनविण्यात आला होता. त्याचे पुढे काहीच झाले नसल्याचे या आपत्तीत प्रशासनाच्या अपयशामुळे समोर आले आहे.

आपत्ती व्यवस्थापन आराखडा फक्त कागदावरच राहीला नसता तर ही वेळ आली नसती, असेही पंडित पाटील यांनी म्हटले आहे. मागे महाडमध्ये कोसळलेल्या दरडीवेळी आपण तत्कालीन प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत तळीये या गावाला धोका असल्याचे सांगितले होते. मात्र त्यावर काहीच कार्यवाही न करता कोसळलेल्या दरडीनंतर प्रशासन जागे झाले, असले तरी उशिरापर्यंत तेथपर्यंत पोहचू शकले नाही हेही दुर्दैव आहे.

राजूपरी येथील डोंगरावर तडे गेले होते. तरी देखील प्रशासन थंडच होते. तळीये गावाला फक्त धोक्याचा इशारा देण्यापलिकडे प्रशासनाने काहीच केले नाही. जर वेळीच तेथील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असते तर आज जिवीतहानी टळली असती, असा दावाही पंडित पाटील यांनी केला आहे.

Exit mobile version