उद्यानातील सुरक्षा रक्षकांची परवड

| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |

पनवेल महानगरपालिकेने पालिका क्षेत्रातील विविध उद्याने व सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा रक्षकांच्या सेवेसाठी आधुनिक सुरक्षा केबिन उभारल्या आहेत. खांदा वसाहत सेक्टर-6 येथील उद्यानातही अशी केबिन बसविण्यात आली आहे. मात्र, या केबिनमध्ये पिण्याच्या पाण्यासह इतर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने सुरक्षा रक्षकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या केबिनमध्ये बसण्याची तसेच शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असली, तरी शौचालयासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. तसेच, ड्रेनेज लाईनचे जोडणीचे कामही अद्याप पूर्ण झालेले नसल्याचे समोर आले आहे. परिणामी, शौचालय असूनही त्याचा उपयोग होत नसल्याने सुरक्षा रक्षकांची गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे, या सुरक्षा केबिन बसवून वर्षभराहून अधिक कालावधी लोटला असतानाही मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे संबंधित विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Exit mobile version