उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रचार

| पालघर | वार्ताहर |

पालघर लोकसभा जागेसंदर्भात महायुतीमधील भाजप व शिवसेनेतील तिढा सुटला नसल्याने अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. तरीदेखील विद्यमान खा. राजेंद्र गावित यांनी वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक नेतेमंडळींच्या वैयक्तिक गाठीभेटी घेत प्रचाराला सुरुवात केली आहे. शिवसेनेमधून निवडून आलेल्या राजेंद्र गावित हे उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पालघरची जागा शिवसेनेकडे राखून ठेवण्यात येते की भाजप या जागेवर दावा करतो याबाबत अनिश्चितता आहे. गावित यांच्याविषयी महायुती पक्षातील नेते मंडळी व नागरिकांमध्ये असलेल्या नाराजीबाबत अहवाल वरिष्ठांकडे प्राप्त झाल्याने त्यांच्या उमेदवारीबाबतची घोषणा लांबणीवर पडली आहे, असे सांगण्यात येते.

Exit mobile version