श्रीरामाच्या 30 फुटी मूर्तीची प्रतिष्ठापना
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहरातील दहिवली येथील उल्हास नदीच्या तीरावर प्रभू श्रीरामांच्या 30 फुटी मूर्तीचे लोकार्पण होणार आहे. त्याआधी त्या ठिकाणी श्रीरामाच्या मूर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा रविवारी (दि. 06) सकाळी धार्मिक विधी यांच्या माध्यमातून झाला.
श्रीराम मूर्तीच्या साक्षीने आणि भक्तिमय वातावरणात होम-हवन सोहळ्याला सुरुवात झाली. कर्जत-खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या “प्रभू श्रीराम प्रतिअयोध्या“ या साकारली आहे. त्या ठिकाणी प्रभू श्रीरामाची 30 फूट उंचीची भव्य मूर्ती साकारली आहे. या मूर्तीचे लोकार्पण रात्री होणार असून, त्या आधी सकाळी या भव्य मूर्तीचे प्राणप्रतिष्ठापना 21 दांपत्यांच्या उपस्थितीत विधीवत करण्यात आली. पुरोहित ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारांनी संपूर्ण परिसरात भक्तिभाव, सात्विकता आणि दिव्यतेचे वातावरण निर्माण झाले. कर्जत शहरातील अनेक श्रद्धावान जोडप्यांनी या पवित्र यज्ञामध्ये सहभागी होण्याचा मान मिळवला. प्रभू श्रीरामांच्या भव्य मूर्तीसमोर नतमस्तक होण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. भगव्या पताका, रामनामाचा गजर आणि शंखध्वनीने संपूर्ण गणेश घाट परिसर राममय झाला आहे.