कर्जतमध्ये उभे राहणार प्रशासकीय भवन

राज्य शासनाची एकूण 12 शासकीय कार्यालये तेथून कामकाज करतील.

 राज्य शासनाची एकूण 12 शासकीय कार्यालये तेथून कामकाज करतील. 

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील शासकीय कार्यालये ही वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने तालुक्यातील ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन 2004 मध्ये तत्कालीन आमदार सुरेश लाड यांनी एका छताखाली सर्व प्रशासकीय कार्यालये असावीत अशी भूमिका घेऊन सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता.तब्बल 18 वर्षांनी कर्जत तालुका प्रशासकीय भवन इमारतीला मुहूर्त मिळाला असून ठाकरे सरकारने या भवनाच्या कामाची निविदा मंजूर केली आहे.14 कोटी रुपये खर्चून कर्जत या तालुक्याचे ठिकाणी पोलीस परेड मैदानाच्या तलाठी कार्यालयाच्या जमिनीवर 2850 चौरस मीटरचे बांधकाम करून तीन मजली इमारत उभी राहत आहे.

त्यावेळी कर्जतचे आमदार राष्ट्रवादीचे सुरेश लाड हे होते,तर राज्यात भाजप-सेना यांच्या युतीचे सरकार सत्तेवर होते.त्यामुळे सुरेश लाड यांचे प्रयत्न तोकडे पडत होते,शेवटच्या वर्षी 2017 मध्ये तत्कालीन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी कर्जत प्रशासकीय भवन इमारतीला तांत्रिक मान्यता देत 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.परंतु त्या कामाची निविदा काही सार्वजनिक बांधकाम विभागाने तीन वर्षे काढली नव्हती.ठेकेदार कंपनीने ही निविदा 14 कोटी रुपयांना स्वीकारली असून पोलीस मैदानाच्या बाजूला तलाठी कार्यालये असलेल्या जमिनीवर तीन मजली प्रशासकीय भवन आता उभे राहणार आहे.2850 चौरस मीटरचे बांधकाम केले जाणार असून राज्य शासनाची एकूण 12 शासकीय कार्यालये तेथून कामकाज करतील.  

Exit mobile version