| नेरळ | प्रतिनिधी |
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने राज्यभर ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ अभियान सुरु आहे. त्याच अनुषंगाने आगामी अभियानाचे नियोजन, संघटनात्मक बाबी तसेच विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी कर्जतमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत या अभियानांतर्गत गावपातळीवर संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार ज्येष्ठ शिवसैनिकांनी व्यक्त केला.
कर्जत-खालापूर तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी प्राधान्याने काम केले पाहिजे. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देणे हेच आपले प्रमुख ध्येय असले पाहिजे. त्यासाठी आपापसांतील मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने काम करण्याची गरज आहे, असा निर्धार शिवसैनिक यांनी निश्चित केला आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा सावंत, तालुका संघटक माधव कोळंबे, राजाराम शेळके, उप नगराध्यक्ष संतोष पाटील, उप तालुका प्रमुख दशरथ भगत, जिल्हा परिषद सदस्य सुनिता मोरे, विभागप्रमुख लक्ष्मण पोसाटे, रोहिदास मोरे, निलेश घरत, कृष्णा जाधव, योगेश दाभाडे, सुरेश बोराडे, प्रमिला बोराडे, नगरसेविका सुचिता खोत, योगिता डागा, मयुरी गजमल, भीम मुसळे, आकाश जाधव, नीता मांडे, पंकज म्हसे तसेच असंख्य शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.







