| पनवेल | प्रतिनीधी |
कळंबोली पोलिसांनी अमली पदार्थविरोधी कारवाई करत सुमारे 5 लाख 67 हजार रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केले असून, या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मार्बल मार्केट परिसरातील झोपडपट्टीजवळ काही जण हेरॉईन विक्रीसाठी आणणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून कारवाई केली. यात रोहित राजभान सिंग उर्फ रुबी आणि जमील मोहम्मद वालामनसा चौधरी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून मोठ्या प्रमाणात हेरॉईन जप्त केले. दोघांविरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली असून, तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी मोहीम अधिक तीव्र केली आहे.







