चिपळूण | प्रतिनिधी |
तालुक्यातील चिवेली येथील सुनील साळुंखे, दिपक साळुंखे व विलास साळुंखे यांच्या पुढाकाराने मुंबईतील दिप जनसेवा समितीच्या माध्यमातून काडवली बौद्धवाडी व रोहिदासवाडीमधील गरजू ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. साळुंखे परिवाराने यांनी वस्तू चिवेली येथे पत्रकार संतोष सावर्डेकर यांच्यासह विजय मोहिते,संदीप मोहिते, हरीश मोहिते यांच्याकडे सुपूर्द केल्या.
यानंतर या जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाचा कार्यक्रम बौद्धवाडी येथे झाला. यावेळी गरजूंना या वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी शंकर सावर्डेकर, हरीश मोहिते, निलेश मोहिते, चंद्रकांत मोहिते, सुभाष मोहिते, भगवान मोहिते, प्रकाश मोहिते, तुळसा मोहिते, सुरेखा मोहिते आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल येथील गरजू ग्रामस्थांनी दीप जनसेवा समिती व साळुंखे परिवाराला धन्यवाद दिले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संदीप मोहिते यांनी मानले.