। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
वाहन चालवण्याचा परवाना नसताना देखील कार भरधाव वेगाने चालवून पोलीस शिपायाला धडक दिली. या धडकेत खांदेश्वर पोलीस ठाण्याचे स्वप्निल अनंता कोळी हे जखमी झाले. या प्रकरणी प्रथम सचिन गायकवाड यांच्या विरोधात 8 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. स्वप्निल कोळी हे 7 जानेवारी रोजी एसपीरिया सोसायटी, सेक्टर 6, नवीन पनवेल येथे कोंबिंग ऑपरेशन दरम्यान कारवाई करत होते. यावेळी प्रथम गायकवाड रा. शिवाजीनगर झोपडपट्टी पनवेल याने भरधाव वेगाने कार चालवली. पोलिसांनी त्याला कार थांबवण्याचा इशारा केला. मात्र, त्याने कार न थांबवता पोलीस शिपाई स्वप्निल कोळी यांना धडक दिली. या धडकेत ते जखमी झाले.







