कोकणचे सौंदर्य अबाधित ठेवा – आ.योगेश कदम


खेड । प्रतिनिधी ।

निसर्ग सौंदर्य हे कोकणचे वैशिष्ट आहे. यामुळेच पर्यटक कोकणाकडे आकर्षित होतात. निसर्ग सौंदर्य अबाधित राखण्यासाठी वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन करणार असून वनविभाग, कृषी विभाग, सामाजीक वनीकरण, पंचायत समिती, सामाजिक संस्था, वृक्षप्रेमी तसेच शैक्षणिक संस्थांना सोबत घेऊन याबाबत काम करणार असल्याचे आ.योगेश कदम यांनी सांगितले.

सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामकृती दलातील सदस्यांना या मोहिमेत सहभागी करुन घेणार आहोत. तहसिलदार, उपविभागिय अधिकारी यांनाही वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन मोहिमेत सक्रिय करुन खेड, दापोली, मंडणगड तालूक्यात मोठया प्रमाणात वृक्षलागवड करताना राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गावर वड, पिंपळ, कडूलिंब सारखी ऑक्सीजन देणा-या तसेच सौंदर्यात भर टाकणारी शोभीवंत फुलझाडांची ही लागवड करण्यात येणार आहे.

13 जून 2021 रोजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या योजनेचा शुभारंभ करणार असून खेड दापोली रस्ता, खेड मंडणगड रस्ता, खेड शिवतर रस्ता, सुकिवली कर्टेल तळे रस्ता तसेच राष्ट्रीय महामार्गावर वृक्षलागवड व शोभिवंत फुलांच्या झाडांचे वृक्षरोपण करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या सर्व पदाधिका-यांसह, सेवाभावी संस्था, शैक्षणिक संस्था हे यात सहभागी होणार आहेत. दापोली मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून मी सर्व नागरिकांना, पर्यावरण प्रेमींना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.


कोरोनाने आपल्या सर्वांना ऑक्सिजनचे महत्व पटवून दिलेले आहे. ही वेळ आहे यातून बोध घेऊन वेळीच जागे होण्याची, कोकणचे नयनरम्य नौसर्गिक सौंदर्यात वाढ करण्यासाठी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून आदर्श घेण्याची मी सुरुवात केलेली आहे. मला आपल्या सर्वांची साथ हवी आहे. आपण सर्वांनी मिळून घनदाट वनराई जोपासूया
आ.योगेश कदम

Exit mobile version