कोकणात शिमगोत्सवाची जोरदार तयार

चाकरमान्यांनी गावे गजबजली,मंदिरांवर रोषणाई
| ओरोस | प्रतिनिधी |
सिंधुदुर्गात शिमगोत्सवाची धूम सुरू होत आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या सणांपैकी हा उत्सव असला, तरी तो संवेदनशील मानला जातो. त्यामुळे पोलिसांसह प्रशासनही शिमगोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सज्ज झाला आहे.या सणाच्या निमित्ताने चाकरमान्यांची पाऊले गावाकडे पडू लागल्याने कोकणातील गावे गजबजून गेली आहे.गावातील मंदिरेही आकर्षक विद्युत रोषणाईने उजळली आहेत.
सिंधुदुर्ग पोलिस दलाकडून सर्व गावांमध्ये व शहरांमध्ये पोलिसांची गस्त वाढविण्यात येणार असून, होळी व धूलिवंदन या दिवशी उपदव्याप करणार्‍या व नाहक त्रास देणार्‍यांवर विशेष पथकाद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक शांतता अबाधित ठेवून मोकळ्या वातावरणात कोविड-19 चे नियम पाळून व शासनाने वेळोवेळी केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून होळी उत्सव साजरा करून सहकार्य करावे, असे आवाहन अप्पर पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले.
जिल्ह्यात गुरुवार (दि.17)पासून शिमगोत्सव सुरू होणार आहे. असे असले तरी प्रत्येक गावच्या प्रथा वेगळ्या असतात. सांगेली (सावंतवाडी) येथील शिमगोत्सव बुधवारीच (दि. 16)पासून सुरू झाला आहे. . यानिमित्त शुक्रवारी (ता. 18) धूलिवंदन व मंगळवारी ( दि. 22) रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सार्वजनिक होळी व खासगी होळी होणार आहे. होळी उत्सवाच्या मुदतीत पोलिस बंदोबस्ताची आखणी करण्यात आली असून, जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त, फिक्स पॉइंट नेमण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये पोलिस अधिकारी किंवा अंमलदार यांची गस्त ठेवण्यात येईल. त्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. होळी बंदोबस्तासाठी जिल्हा पोलिस दलातील पोलिस अधिकारी, पोलिस अंमलदार, गृहरक्षक दलातील होमगार्ड त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्गावर पोलिस अधिकारी व वाहतूक पोलिस अंमलदार, प्रत्यक्ष बंदोबस्तासाठी नेमण्यात येणार आहेत. दंगल नियंत्रण पथक 24 तास तैनात केले आहे. होळी उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी जिल्हा पोलिस दलाकडून सर्व गावांमध्ये व शहरांमध्ये पोलिसांची गस्त वाढविण्यात येणार आहे. होळी व धूलिवंदन या दिवशी उपदव्याप करणार्‍या व नाहक त्रास देणार्‍यांवर विशेष पथकाद्वारे कारवाई करण्यात येणार आहे.
कोट
नागरिकांनी सामाजिक शांतता अबाधित ठेवून मोकळ्या वातावरणात कोविड-19 चे नियम पाळून व शासनाने वेळोवेळी निर्गमीत केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून होळी उत्सव साजरा करून सहकार्य करावे,
श्री,बगाटे,अप्पर पोलिस अधीक्षक

Exit mobile version