कोकणावरचे संकट कायम; 27 व 28 जुलैला सतर्कतेचा इशारा

मच्छिमारांना सतर्कतेचे इशारा, हवामान विभागाची माहिती
। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
गेला आठवडाभर मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याची दैना केली आहे. शनिवारी काही भागात पावसाने विश्रांती घेतल्याचे पाहून अनेकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. मात्र हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनूसार पुढिल 5 दिवस उत्तर महाराष्ट्र, गोवा, कोकण किनारपट्टीसाठी धोक्याचे असल्याचे समजते. 40-50 किमी प्रतितास वेगाने वाबण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे 24, 27 आणि 28 जुलै 2021 रोजी महाराष्ट्र किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढच्या 48 तासात शहर व उपनगरामध्ये पावसासह मध्यम ते गडगडाटीसह पाऊस वादळचा अंदाज वर्तवला आहे.

28 जुलैपर्यंत मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यावरील संकट अद्यापही ओसरले नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कालावधीत जोरदार वारे 60 किमी प्रतितास वेगाने दक्षिणेकडे व बाहेर पडण्याची शक्यता आहे.

27 आणि 28 जुलै दरम्यान महाराष्ट्र किनारपट्टीवरील मच्छिमारांना किनारपट्टीवर व बाहेर जाऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे. मालवण ते वसईपर्यंतच्या किनारपट्टीवर उद्या सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत साधारणतः 9.9 मीटरच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. तसेच वेंगुर्ला ते वास्को, गोवा दरम्यान 2.7 ते 6.6 मीटरच्या लाटा उसळण्याची शक्यता असल्याचेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Exit mobile version