खबरदार! खासगी वाहनाने प्रवास करताय?…तुमच्यावरही येऊ शकतो हा प्रसंग…

धारदार चाकुने हल्ला; 30 हजारांचा रोकड लंपास

। पनवेल । वार्ताहर ।
एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांनी खासगी बसकडे आपला मोर्चा वळविला होता. मात्र खासगी बसमधून प्रवास करताना अनेकांना असुरक्षिततेचे अनुभव आल्याचे समोर आले आहे. अलिकडेच नवी मुंबई येथील कळंबोलीलगत हायवेवर एका खासगी बरमधुन प्रवास कराणार्‍या व्यक्तीवर 2 ते 4 चोरट्यांनी चाकुने हल्ला केला. तसेच त्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर फेकून त्याच्याजवळील बॅग हिसकावून पळ काढला आहे. यामध्ये 30 लाख रुपये असल्याचे फिर्यादीने सांगितले आहे.
खासगी बसमधुन हा प्रवासी प्रवास करत होते. त्याच्या जवळील बॅगमध्ये लाखोंची रक्कम होती. कळंबोलीजवळील हायवेवर प्रवासी बसमधुन उतरत असताना 2 ते 4 जणांनी त्या प्रवाशावर चाकूने हल्ला केला व त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून हातातील बॅग हिसकावली. या झटापटीत प्रवासी जखमी झाल्याने तो चोरांना फारसा विरोध करू शकला नाही.बॅगेत 30 लाख रुपये असल्याचे जखमी प्रवाशाकडुन सांगण्यात आले आहे. हा सर्व कट असल्याचा अंदाज पोलिसांनी प्राथमिक तपासातून व्यक्त केला आहे. कामोठे पोलीसांकडुन या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याच सांगितले जात आहे.

Exit mobile version