| पनवेल | प्रतिनिधी |
सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागातर्फे खारघर आणि लॉजिस्टिक पार्क परिसरात अनधिकृत बांधकामांवर सिडकोने बुलडोझर फिरवला आहे. दोन दिवसांत मोठी कारवाई करून परवानगी न घेता उभारलेली दुकाने, वॉशिंग सेंटर, ढाबा, कंटेनर कार्यालये आणि शेड्स पाडण्यात आली. खारघरमधील सेक्टर 35 आय, 35 डी आणि 35 ई भागात कारवाई झाली. येथे बांबू शेडमध्ये सुरू असलेली एकूण 19 व्यावसायिक दुकाने आणि एक वॉशिंग सेंटर हटविण्यात आले. कॉर्पोरेट पार्कसाठी राखीव असलेल्या भूखंडावर उभारलेला ढाबाही पाडण्यात आला. तसेच फुटपाथवर सुरू असलेली दुकानेही हटवण्यात आली. ही सर्व बांधकामे सिडकोची परवानगी न घेता उभारण्यात आली होती. त्यामुळे ती हटविण्याची कारवाई करण्यात आल्याचे सिडको प्रशासनाने स्पष्ट केले.







