चिपळूण | प्रतिनिधी |
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकर्यांना भात बी-बियाणे खतेवाटप तसेच खेर्डी, शिरळ, कुंभार्ली ग्रामपंचायतीत तर चिपळूण नगर परिषद ग्रामपंचायतीत पी. पी. ई. किट व मास्कचे वाटप करण्यात आले. चिपळूण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या गोदामात शेतकर्यांना भात बी- बियाणे व खते वाटप करण्यात आले.
यावेळी वासुदेव मेस्त्री, महेश कदम, रुपेश आवले, फैसल पिलपिले, अश्फाक तांबे, गुलजार कुरवले, नंदू कामत, मनोज शिंदे, शकील तांबे, साजिद सरगुरोह, सरफराज घारे, ऋषिकेश शिंदे, एकनाथ माळी, यश पिसे आदी उपस्थित होते.
यानंतर खेर्डी, शिरळ, कुंभार्ली ग्रामपंचायतीत व चिपळूण नगर परिषदेत पीपीई किटचे वाटप करण्यात आले. शिरळ ग्रामपंचायतीत पीपीई कीट वाटप प्रसंगी सरपंच श्री. राऊत, उपसरपंच फैय्याज शिरळकर, सदस्य गुलजार कुरवले, ग्रामसेवक व आशा सेविका उपस्थित होत्या. कुंभार्ली ग्रामपंचायतीत या कार्यक्रमाप्रसंगी गणेश कोलगे, अन्य ग्रामस्थ व ग्रामसेवक उपस्थित होते. तर खेड येथील कार्यक्रमाप्रसंगी सरपंच वृंदा दाते, उपसरपंच बाबु शिर्के, सदस्य प्रकाश पाथरवट, विनोद भुरण, सदस्य अपर्णा दाते, सुप्रिया उतेकर, अश्विनी पंडित, वैशाली मोरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. चिपळूण नगर परिषद येथील सफाई कर्मचार्यांना देखील पीपीई किट तर खेर्डी येथील पोलिसांना मास्कचे वाटप करण्यात आले.