जेएनपीटी | वार्ताहर |
कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन चिरनेर गावातील रुग्णांना तात्काळ उरण, पनवेल, नवीमुंबई येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात यावे यासाठी राष्ट्रीय इंटक चे सचिव तथा कामगार नेते महेंद्र घरत यांनी चिरनेर गावांसाठी रुग्णवाहिका गाडी भेट दिली आहे.महेंद्र घरत यांच्या या समाजाभिमुख कार्याबद्दल चिरनेर ग्रामपंचायत, पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ यांनी आभार व्यक्त केले आहेत.
ज्या रुग्णांना रुग्णवाहिकेची गरज असेल त्यांनी तात्काळ सचिन घबाडी 9987012351, किरण कुंभार 9987185237, समीर डुंगीकर 9221262552, परेश पोवळे 7039215196, राजेंद्र भगत 8422025930 या ग्रामस्थांशी संपर्क साधावा असे आवाहन ही चिरनेर ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे.