देशभरातील 12 बंदरातील 95 स्पर्धक सहभागी
| चिरनेर | प्रतिनिधी |
अखिल भारतीय बंदरांची 44 वी कॅरम स्पर्धा जेएनपीएच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या कॅरम स्पर्धेत देशभरातील 12 बंदरातून 95 स्पर्धक सहभागी झाले आहेत. यामध्ये 15 महिला स्पर्धकांचाही समावेश आहे. सोमवार (दि.23) पासून सलग तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन जेएनपीएचे उपाध्यक्ष रवीश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी जेएनपीए प्रशासनाच्या वरिष्ठ प्रबंधक, सेक्रेटरी तथा जेएनपीए खेल परिषदेच्या अध्यक्षा मनिषा जाधव, कामगार ट्रस्टी रवींद्र पाटील, दिनेश पाटील, जेएनपीएचे विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जेएनपीएत आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय बंदर 44 व्या कॅरम स्पर्धेत देशभरातील 12 प्रमुख बंदरांपैकी 9 बंदरातील 9 टीम सहभागी झाल्या आहेत. यामध्ये सिंगल, डबल व टीम इव्हेंट अशा विविध प्रतियोगितांमध्ये ही स्पर्धा चालणार आहे. या स्पर्धेसाठी 95 स्पर्धक सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे या वर्षी पहिल्यांदाच महिलांसाठी कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये पाच बंदरातील पाच महिला टीममधील 15 महिला सहभागी झाल्या आहेत, अशी माहिती जेएनपीए खेल परिषदेचे महासचिव कल्पित म्हात्रे यांनी दिली.






