| नेरळ | प्रतिनिधी |
झुगरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मराठी माध्यमात प्रवेश घेणारी नाव विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला. या प्रवेश उत्सवाच्या निमित्ताने रोटरी क्लब वरळी कडून नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले.
झुगरे वाडी येथे इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ बॉम्बे वरळी यांच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शैक्षणिक साहित्य वाटप करून, नवीन आदर्श घालून दिला असून, इयत्ता पहिली त येणाऱ्या विद्यार्थ्यांना हे साहित्य मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी शिक्षण विभागात विविध महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यास सुरुवात केली असून या उपक्रमाचा भाग म्हणून, मराठी शाळांचा पट वाढविण्यासाठी इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्यात आले. या विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ बॉम्बे वरळी यांचे माध्यमातून रविवारी शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या वेळी शाळेसाठी स्पीकर व प्रिंटर भेट देण्यात आले असून सांस्कृतिक कार्यक्रम, व शासकीय कार्यक्रमासाठी यांचा वापर होणार असून एक लाख रुपये किंमतीचे साहित्य शाळेसाठी देण्यात आले.





