| अलिबाग | प्रतिनिधी ।
तालुक्यातील वरसोली येथील दिलीप पाटील यांचे बुधवारी (दि.12) निधन झाले. निधनासमयी ते 66 वर्षांचे होते. दिलीप पाटील हे मितभाषी, मनमिळाऊ आणि प्रेमळ स्वभावाचे आणि सर्वांच्या सुख-दुःखात सक्रिय सहभाग घेणारे व्यक्तिमत्त्व होते. तसेच, ते सेवानिवृत्त कर्मचारी होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच वरसोली परिसरासह पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी (दि.13) वरसोली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ, मित्रपरिवार व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी दीपाली पाटील, दोन मुले नितीश व मयूर पाटील, सुना, नातवंडे तसेच इतर कुटुंबीय असा मोठा परिवार आहे. दिलीप पाटील यांच्या दशक्रिया विधी (दहावे) शुक्रवारी (दि.21) सकाळी 8.00 वाजता वरसोली येथील स्मशानभूमीत होणार असल्याची माहिती पाटील कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.






