देशभरात मुंबई पॅटन राबवा

मुंबई

 । मुंबई । वृत्तसंस्था ।

कोरोनावर यशस्वी मात करायची असेल तर देशभरात मुंबई मॉडेल राबवा, असे आदेश केंद्रीय आरोग्य खात्याने सर्व राज्य सरकारांना आज दिले. सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाची विकास धोरणे ठरवणाणा़र्‍या निती आयोगाने मुंबई मॉडेल आणि मुंबई महापालिकेचे तोंड भरून कौतुक केल्यानंतर आता केंद्रीय आरोग्य खात्यानेही कोरोना नियंत्रणाचा खात्रीलायक उपाय म्हणून मुंबई मॉडेलची शिफारस राज्यांना केली आहे.

 यावेळी कोरोनाला आळा घालणा़र्‍या पुण्याचा उल्लेखही केंद्रीय आरोग्य खात्याने आवर्जून केला.कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने राबवलेले मुंबई मॉडेल नेमके आहे तरी कसे याची माहिती केंद्रीय आरोग्य खात्याने आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सहसचिक लव अगरवाल यांनी दिली. यात राज्य सरकार आणि पालिकेच्या प्रशासकीय कामांची उत्तम विभागणी आणि मुंबईकरांबरोबर सुरू असलेला उत्तम संवाद याचा आवर्जून उल्लेख केला.भाजप नेते खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक करत मआता कुठे गेले अंधभक्तफ असा मोदी सरकार आणि भाजप समर्थकांना सणसणीत टोला लगावला आहे. 

आजच मोदी सरकारच्या प्रवक्त्यांनी मुंबई मॉडेलचे कौतुक केले आहे. कोरोनाची परिस्थिती मुंबईने चांगल्या रितीने हाताळल्याचे म्हटले आहे. याचाच अर्थ उद्धव ठाकरे यांच्याकडून आदर्श घेण्यासारखा आहे. कोरोना परिस्थितीच्या बाबतीत त्यांचा आदर्श घ्यावा असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. सर्वात आधी मी ही गोष्ट म्हटली होती. त्यावेळी मला अनेकांनी नावे ठेवली. आता केंद्रानेच उद्धव ठाकरे यांचे चांगले काम मान्य केले आहे. 

Exit mobile version