नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशात करोनाच्या दुसर्या लाटेचा धोका अजूनही टळलेला नसला तरी ही लाट आता ओसरताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात एक लाख 20 हजार 529 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली. त्यामुळ उपचाराधीन रुग्णांची संख्या आता 15 लाख 55 हजार 248 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात एक लाख 97 हजार 894 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता दोन कोटी 67 लाख 95 हजार 549 वर पोहोचली आहे. देशातला रुग्ण बरे होण्याचा दर आता 93.38 टक्के झाला आहे.