पंढरपुरात राज्यातील पहिले लहान मुलांचे कोविड हॉस्पिटल सुरु

पंढरपूर : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मोठ्या प्रमाणात नवजात बालके आणि लहान मुलांमध्ये कोरोनाचे संक्रमण आढळू लागल्याने अशा बालकांवर उपचारासाठी पहिले कोव्हिड हॉस्पिटल पंढरपूरमध्ये सुरु होणार आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी डॉ. शीतल शहा यांच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक निर्णय देण्याची भूमिका घेतल्याने आता अशा लहान चिमुरड्यांचा प्रश्‍न सुटणार आहे. कोरोनाचा प्रसार गरोदर महिलांना झाल्यानंतर अनेक बालकांना हा त्रास मातेच्या दुधामुळे होऊ लागल्याचे समोर येत असून, यातूनच त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने प्रशासन हैराण झाले होते. पंढरपूरमधील डॉ. शीतल शहा या ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ असल्याने त्यांच्याकडे सोलापूर, सांगली जिल्ह्यातून वारंवार अशा लहान मुलांच्या उपचारांबाबत विचारणा होत होती. यातूनच त्यांनी जिल्हा प्रशासनाला तसा प्रस्ताव दिला होता.

Exit mobile version