। डोंबिवली । प्रतिनिधी ।
कल्याण मध्ये पुन्हा एकदा परप्रांतीयांची दादागिरीची घटना समोर आली आहे. परप्रांतीय व्यक्तीने एका 9 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. उत्तम पांडे (40) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. पांडे याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या मराठी कुटुंबाला पांडे व त्याच्या पत्नीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण जवळील आडीवली ढोकळी परिसरात एका अल्पवयीन मुलीशी उत्तम पांडे याने अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केल्याचा आरोप पिडीत मुलीच्या पालकांनी केला आहे. शनिवारी रात्री 10 च्या सुमारास पीडित मुलगी घरासमोर खेळत असताना पांडे याने तिला घरात ओढून तिच्यासोबत गैरवर्तन केले. मुलीने सदर घटना आपल्या वडिलांना सांगितली. वडिलांनी पांडे याच्या घरी जाऊन त्याला जाब विचारण्यास सुरुवात केली. यावेळी पांडे याने तिच्या वडिलांशी वाद घालण्यास सुरुवात करत मारहाण केली. पीडित मुलीच्या आजीने मुलीच्या आईला हे सांगताच ती देखील घरी आली. त्याच सोबत परिसरात असलेल्या लेडीज बार मध्ये तसेच देह विक्रीचा व्यवसाय करणार्यानमध्ये बंगाली भाषिक महिलांची संख्या मोठी आहे. त्याच बरोबर फेरीवाला व्यवसाय तसेच पदपथावर केल्या जाणार्या व्यवसाया मध्ये बंगाली भाषिक नागरिकांचे प्रमाण मोठे आहे. सध्याच्या घडीला बांगलादेशात अल्पसंख्याक समूहावर बहुसंख्य असलेल्या समुदायाकडून करण्यात येत असलेल्या अत्याचारामुळे भारतातील बंगाली भाषिक नागरिकांना बांगलादेशी म्हणून टार्गेट करण्यात येत असल्याने बंगाली भाषिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.