| अलिबाग | प्रतिनिधी |
जिल्हा क्रीडा अधिकारी अलिबाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने व एचओसीएल रसायनी खालापूर शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा 2026/2027 आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेमध्ये पीएनपी माध्यमिक शाळा वेश्वी अलिबाग शाळेतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश संपादन केले.
सदर स्पर्धांमध्ये 14 वर्षाखालील मुले यामध्ये विशाल संतोष पवार थाळी फेक प्रथम क्रमांक, 17 वर्षाखालील मुले राज कल्पेश म्हात्रे थाळी फेक प्रथम क्रमांक, 14 वर्षाखालील मुले विशाल संतोष पवार 80 मीटर हार्डल्स द्वितीय क्रमांक मिळवून त्यांची मुंबई विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या नेत्रदीपक यशाबद्दल पी.एन.पी. संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, माध्यमिक शाळा वेश्वीचे मुख्याध्यापक निलेश मगर, क्रीडा प्रशिक्षक चेतन पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.







