| म्हसळा | प्रतिनिधी |
म्हसळा परिसरात एका व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखूजन्य गुटखा बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेला आढळून आला. पोलिसांनी छापा टाकून हा साठा जप्त केला. महाराष्ट्र शासनाने आरोग्यास अपायकारक असल्याने गुटखा व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घातली असतानाही आरोपी विक्रीसाठी साठा ठेवत असल्याचे आढळले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एडवळे करीत आहेत.







