| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील ममदापुर वाडीकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करण्यात आला आहे. या रस्त्याची गेल्या पाच वर्षांपासून दुरवस्था झाली होती आणि त्यानंतर हा रस्ता डांबरीकरण करण्यात आला आहे. मात्र, रस्त्याची अवघ्या 15 दिवसांत धूळधाण झाली असून नित्कृष्ट दर्जाचे डांबरीकरण केल्याने या रस्त्याची हि अवस्था झाली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
नेरळ विकास प्राधिकरण हद्दीत असलेल्या ममदापुर ग्रामपंचायतमधील ममदापुर वाडीकडे जाणाऱ्या 2 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली होती. रस्त्यातील खड्डे आणि पावसाळ्यात त्या खड्ड्यात साठणाऱ्या पाण्यामुळे या रस्त्याची अवस्था दयनीय झाली होती. स्थानिक आदिवासी लोकांनी अनेक वर्षे रस्त्याचे डांबरीकरण व्हावे, अशी मागणी केली होती. मात्र, रस्त्यावर काँक्रीटीकरण करावे, अशी मागणी प्राधिकरण कडे केली जात होती. परंतु, रस्त्याची अवस्था पाहता प्राधिकरणाने चक्क तेथे डांबरीकरण केले आहे. त्यातही डांबरीकरण कामाचा दर्जा नित्कृष्ट असल्याने अवघ्या 15 दिवसात डांबर बाहेर आले आहे.






