महाबळेश्‍वरमध्ये काळया गव्हाची पेरणी

सातारा

। महाबळेश्‍वर । वृत्तसंस्था ।

गहू लागवडीच्या विविध प्रयोगासाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्‍वरमध्ये काळया गव्हाची पेरणी करण्यात आली आहे. जपान आणि भारतीय गव्हाचे संकर करून तयार केलेले हे ङ्गएनबीएमजीफ नावाचे वाण असून त्यातील घटक हे आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे अभ्यासकांकडून सांगण्यात आले आहे. महाबळेश्‍वर येथे दहा एकर क्षेत्रावर या काळया गव्हाची प्रायोगिक तत्त्वावर नुकतीच पेरणी केली आहे.

महाबळेश्‍वरचे भौगोलिक स्थान आणि हवामान हे गहू लागवडीसाठी पोषक असल्याने येथे गेल्या अनेक वर्षांपासून गव्हाच्या लागवडीचे विविध प्रयोग केले जातात. यातूनच येथे गव्हावर संशोधन करण्यासाठी गहू गेरवा या संस्थेचीही स्थापना करण्यात आलेली आहे.केंद्र आणि पंजाब शासनाच्या मोहाली येथील संशोधन केंद्रामध्ये डॉ. मोनिका गर्ग या कृषी शास्त्रज्ञांनी गव्हाचे हे नवीन वाण शोधून काढले आहे. जपान येथील काळा गहू व भारतीय गव्हाचा संकर करत ही नवीन जात तयार केली आहे. या काळया गव्हाची महाबळेश्‍वर तालुक्यात प्रयोगशील शेतकरी गणेश जांभळे यांच्या शेतात प्रायोगिक तत्त्वावर पेरणी करण्यात आली आहे.एक गुंठयाला एक किलो याप्रमाणे दोनशे किलो बी पेरण्यात आले आहे. अजून दोनशे किलो बियाण्यांची शेतकर्‍यांकडून मागणी करण्यात आली आहे. या गव्हाच्या बियाण्याचा दर एकशे वीस रुपये प्रति किलो असा असून वाहतूक खर्चासह त्यास किलोमागे दीडशे रुपये दर पडत आहे. सातार्‍याचे कृषी अधीक्षक विजय राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत गोरड यांच्या प्रमुख उपस्थितीत या नवीन गव्हाच्या वाणाची पेरणी करण्यात आली, कृषी अधिकारी सुनील साळुंखे कृषी सहायक दीपक बोर्डे उपस्थित होते.

Exit mobile version