माणगांवमध्ये पालकमंत्री यांच्याहस्ते रस्त्याचे भूमिपूजन

। माणगाव । वार्ताहर ।

माणगाव नगरपंचायत हद्दीतील बहुचर्चित असणार्‍या जुने माणगाव महामार्ग ते बौद्धवाडी पर्यंतच्या रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सोमवारी (दि.31) सायंकाळी उत्साहात संपन्न झाला.

जुने माणगाव येथील शासकीय विश्रामगृहापासून पुढे काही अंतरापर्यंत रस्त्याच्या कामाचे डांबरीकरण महिनाभरापूर्वी करण्यात आले. त्यानंतर खा.सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आ.अनिकेत तटकरे यांच्या प्रयत्नांनी व सहकार्याने दलित वस्ती योजनेतून महामार्गापासून बौद्धवाडीपर्यंतच्या रस्त्याच्या कामाला 29 लाख रुपये निधी मंजूर झाला असून मोहल्ल्याकडे जाणार्‍या उर्वरित रस्त्याच्या कामाकरिता 10 लाखाचा निधी तर कबरस्तान कंपाउंड वॉलसाठी 25 लाखाचा निधी मंजूर झाल्याची माहिती यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी उपस्थितांना दिली. महामार्गापासून बौद्धवाडीपर्यंतच्या रस्त्याचे काम लवकरच सुरु होऊन ते चांगल्या पद्धतीने करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी उपस्थितांना पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.यावेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष केकाणे, महिला आघाडी तालुका अध्यक्षा संगिता बक्कम, माणगाव शहराध्यक्ष महामूद धुंदवारे, माजी नगराध्यक्ष योगिता चव्हाण, आनंद यादव, प्रांताधिकारी प्रशाली जाधव दिघावकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version