| रोहा | प्रतिनिधी |
रोहा शहरातील अष्टमी येथील डायमंड एज्यूकेशनल अँड वेल्फअर असोसिएशन संचालित मेहबूब इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित विज्ञान, कला व हस्तकला प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मिरजोळी-चिपळूण येथील मुस्लिम अंजुमन मुंबईचे उपाध्यक्ष, लायन्स क्लब ओशिवरा व कोकण कम्युनिटी रीजनल फाउंडेशन रियाधचे माजी अध्यक्ष तसेच स्तंभलेखक रफीक रहीमान दलवाई उपस्थित होते.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध विज्ञान प्रकल्प, कलाकृती व हस्तकलेतील नाविन्यपूर्ण निर्मितींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांची कल्पकता, सादरीकरण कौशल्य व आत्मविश्वास सर्वांनीच कौतुकास्पद असल्याचे नमूद केले.
या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना रफिक दलवाई यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगातील आव्हानांची जाणीव करून देताना सांगितले की, यशासाठी कठोर परिश्रम, स्पष्ट ध्येय आणि सकारात्मक दृष्टीकोन अत्यंत महत्त्वाचा आहे. स्वतःची स्वप्ने तसेच पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्याने मेहनत केल्यास यश नक्की मिळते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी नागोठणे येथील एनईएस हायस्कूलचे सचिव लियाकत कडवेकर, डायमंड एज्युकेशनल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष समीर दर्जी, सचिव अफसर कर्जिकर, खजिनदार मुनव्वर पठाण, समाज अध्यक्ष शफी पानसरी, उपाध्यक्ष मुबीन दळवी, सचिव राहील नागोठकर, समाजसेवज अरिफ पठाण, बशीर डबीर यांच्यासह असंख्य पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापिका तेहमीना बंदरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.







