| रसायनी | प्रतिनिधी |
मोहोपाडा तळेगाव येथील सोनगिरी डोंगर भागातील पाय वाटेजवळ एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. तीचा आकडी येऊन मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. ही महिला अंदाजे 35 ते 40 वयोगटातील असून तिची उंची 5 फूट 4 इंच आहे.तिच्या गळ्यामध्ये काळ्या रंगाचा दोरा व त्यात ताविद, अंगात राखाडी व पांढऱ्या रंगाची साडी, चॉकलेटी रंगाचा ब्लाउज, कंबरेला भगव्या रंगाचा दोरा असा वेश परिधान केला आहे. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव अधिक तपास करीत आहेत. या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास रसायनी पालिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







