रायगडकरांसाठी उद्यापासून नवे नियम


अत्यावश्यक सेवेतील आस्थापनांना सायंकाळी 4 पर्यंत परवानगी

अलिबाग । विशेष प्रतिनिधी।
लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर रायगडकरांसाठी सोमवार (7 जून) पासून नवीन नियम जाहीर करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आज याबाबतचे आदेश जारी केले आहेत.यामध्ये अत्यावश्यक सेवांसह व्यायामशाळा, सलून, ब्युटी पार्लर, स्पाला दिलासा मिळाला आहे.

अत्यावश्यक वस्तू व सेवांची दुकाने हा संपूर्ण आठवडा दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच सार्वजनिक बस वाहतूक 50 टक्के प्रवासी क्षमतेने सुरु राहणार आहे.राज्यात सोमवार (7 जून) पासून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लावलेले निर्बंध उठविण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. जिल्हानिहाय रुग्णसंख्येनुसार असलेला पॉझिटीव्हीटी दर व ऑक्सिजन बेडची उपलब्धता हे निषक ठेवून, निर्बंधांबाबत विविध स्तर निश्‍चित करण्यात आले आहेत.

14ः28 पॉझिटीव्हीटी दर असलेल्या रायगड जिल्ह्याचा समावेश चौथ्या स्तरामध्ये आहे. त्यानुसार पोलीस अधीक्षक-रायगड यांच्या कार्यक्षेत्रासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आज (6 जून) याबाबतचे आदेश जारी केले असून, 7 जून 2021 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून निर्बंध लागू राहणार आहेत.

Exit mobile version