| अलिबाग | प्रतिनिधी |
गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. हवामान खात्याने मंगळवारी (दि.24) ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी सर्तक राहावे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यामध्ये सोमवारी 246 मि.मी. इतका पाऊस पडला. खालापूर, माथेरान, या भागात सर्वात जास्त पाऊस पडला. सरासरी 15. 15.43 मि. मी. इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. रविवारी पावसाने जिल्ह्यातील काही भागात विश्रांती घेतली असली, तरी पावसाने अनेक भागात कोसळून अनेकांची तारांबळ उडविली होती. सोमवारी पावसाचा जोर सुरूच राहिला. त्यामुळे अनेकांचे हाल झाले. जिल्ह्यात मंगळवारी (दि.24) ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. या कालावधीत जोरदार पाऊस पडणार आहे. दरड व पुरग्रस्त भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.