रायगड जिल्हा कुस्ती निवड चाचणी

। खोपोली । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा कुस्तीगीर संघ, खालापूर तालुका कुस्तीगीर संघ आणि लायन्स क्लब खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय 23 वर्षाच्या आतील मुले व मुली यांची कुस्ती निवड चाचणी ही लायन्स क्लब खोपोलीच्या सभागृहात संपन्न झाली. अत्यंत सुसज्ज पद्धतीने चाचणीचे आयोजन केले गेले होते. ग्रीको रोमन आणि फ्री स्टाईल प्रकारच्या कुस्त्या यावेळी खेळल्या गेल्या.

यावेळी खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल, लायन्स क्लब खोपोलीचे अध्यक्ष महेश राठी, खालापूर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष सुनील पाटील, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत चाचणी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष घासे यांनी केले, कुस्तीगीर संघाचे सदस्य राजू गायकवाड, लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे महेश राठी, खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल, खालापूर कुस्ती संघाचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी कुस्तीगिरांना आपल्या भाषणातून मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. या निवड चाचणीतून यशस्वी झालेल्या कुस्तीगिरांना राज्य स्पर्धेत आपले नशीब आजमावण्याची संधी मिळणार आहे. 4 आणि 5 सप्टेंबर रोजी इंदापूर येथे राज्य स्तरावरील स्पर्धा संपन्न होणार आहे.
ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धा मुले
गुलशन कुमार चौरसिया, खालापूर 55 किलो,
किरण गायकवाड पनवेल 60 किलो, सुयश कडवे अलिबाग 63 किलो, विराज पाटील अलिबाग 67 किलो, भगत अलिबाग 72 किलो, सुजन म्हात्रे पनवेल 77 किलो, करण बामगुडे पनवेल 82 किलो, संदीप धामी खालापूर 130 किलो.
फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धा मुले
श्रीनाथ पाटील अलिबाग 57 किलो, ओमकार गायकर पनवेल 61 किलो, रोषण धुळे कर्जत 65 किलो, श्रेयश घुले अलिबाग 70 किलो, दिवेश पालांडे खालापूर 74 किलो, जयेश खरमारे खालापूर 79 किलो, शुभम वरखडे पनवेल 80 किलो, प्रवण दुर्गे कर्जत 92 किलो, ऋषिकेश देशमुख खालापूर 97 किलो, ओमकार पवार खालापूर 125 किलो,
फ्रीस्टाईल कुस्ती मुली
विनिता गवंडी पनवेल 50 किलो, विशाखा गंगावणे कर्जत 53 किलो, अमेया घरत पनवेल 55 किलो, रोशनी परदेशी खालापूर 57 किलो, प्रांजली कुंभार खालापूर 59 किलो, साक्षी शिंदे पेण 62 किलो, प्राची भोईर खालापूर 65 किलो, नेहा पाटील खालापूर 73 किलो, सानिका सुर्यवंशी खालापूर 76 किलो.

Exit mobile version