शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांचा पुढाकार
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील मोठे बंदर येथील अंतर्गत रस्त्याच्या कामाचा भूमीपूजन सोहळा मंगळवारी (दि.11) सकाळी मोठ्या उत्साहात झाला. या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली असून, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने रस्त्यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
शेकापचे रेवदंडा शहर चिटणीस निलेश खोत यांच्या हस्ते या कामाचा उद्घाटन समारंभ करण्यात आला. यावेळी रेवदंड्याच्या माजी सरपंच सोनाली मोरे, संदीप खोत, प्रमोद नवखारकर, शरद वरसोलकर, कृष्णा गायकर, दिलीप धुमाळ, संगीता हडकर, अनिल बाईत, राहुल गणपत आदींसह रेवदंडा येथील शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. रेवदंडा मोठे बंदर अंतर्गत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ भंडारी समाज हॉल येथे श्रीफळ वाढवून करण्यात आला. या रस्त्यासाठी निधी मागणी निलेश खोतसह अन्य कार्यकर्त्यांनी केली. शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नाने जिल्हा परिषद सेस फंडातून निधी मंजूर करण्यात आला.मोठे बंदर अंगणवाडी ते मयेकर चिकीवाले यांच्या घरापर्यंत हा रस्ता असणार आहे. रेवदंडा मोठे बंदर येथे अंतर्गत काँक्रीट रस्ता लवकरच चकाचक होणार असून हा मार्ग स्थानिकांसह पर्यटकांसाठी सुकर होणार आहे.







