रायगड
। अलिबाग। विशेष प्रतिनिधी ।
राज्य शासनाने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण ऐनवेळी थांबवतानाच त्याबाबतच्या सुचना उशिराने जिल्हा आरोग्य विभागाला मिळाल्या. त्यामुळे बुधवारी डोस मिळणार असल्याच्या सुचना आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आल्याने सदर लस घेण्यासाठी प्रतिक्षेत असणार्या या वयोगटातील नागरिकांचा हिरेमोड झाला.45 ते पुढील या वयोगटातील नागरिकांना दुसरा डोस घेता यावा यासाठी अलिबाग शहरातील लसीकरण केंद्रासह जिल्ह्यातील इतर केंद्रांवरील मंगळवारी बंद ठेवण्यात आलेले 18 ते 44 वयोगटातील लसीकरण बुधवारी सुरु राहणार असल्याची माहिती आरोगय प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याचे आवाहन देखील करण्यात आले होते. मात्र शासनाने उशिरा सदरचे लसीकरण थांबवित फक्त 44 ते पुढील वयोगटातील नागरिकांनाच प्रथम आणि द्वितीय डोस दिले जाणार असल्याचे ऐनवेळी जाहीर केले. त्यामुळे झालेला बदल नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रशासनाला वेळच मिळाला नाही. त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार नोंदणीसाठी तसेच नंबर लावण्यासाठी प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर आलेया 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांचा चांगलाच गोंधळ उडाला. मात्र प्रशासनाने असमर्थता व्यक्त केल्याने हताश होऊन त्यांना लस न घेताच परत जावे लागले. कोव्हॅक्सिनची उपलब्ध लस ही 45 वर्षांवरील नागरिक व हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्सच्या दुसर्या डोससाठीच वापरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.