| खोपोली | प्रतिनिधी |
किशोरवयीन मुलींमध्ये आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ खोपोली यांच्या वतीने सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल, शिळफाटा येथे मासिक पाळी आणि स्वच्छतेविषयी जनजागृती व्याख्यानाचे करण्यात आले होते. डॉ. सुषमा देवडीकर यांनी अत्यंत संवेदनशील व शास्त्रीय पद्धतीने मासिक पाळीच्या काळातील स्वच्छतेचे महत्त्व, किशोरवयात होणारे शारीरिक बदल, मासिक पाळीबाबत असलेले गैरसमज व समजुती तसेच पाळावयाच्या योग्य स्वच्छता पद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
रोटरी क्लब ऑफ खोपोलीच्या अध्यक्षा सुनिता चव्हाण आणि सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका धनश्री ठाकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ खोपोली सेक्रेटरी नलिनी रामास्वामी, युथ डायरेक्टर होझैफा टिंबावाला, डॉ. निधी सिंग तसेच इंटरॅक्ट प्रभारी शिक्षकव्याख्याते डॉ.सुषमा देवडीकर आणि सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
व्याख्यानातून डॉ. सुषमा देवडीकर यांनी अत्यंत संवेदनशील व शास्त्रीय पद्धतीने मासिक पाळीच्या काळातील स्वच्छतेचे महत्त्व, किशोरवयात होणारे शारीरिक बदल, मासिक पाळीबाबत असलेले गैरसमज व समजुती तसेच पाळावयाच्या योग्य स्वच्छता पद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी मनमोकळेपणाने प्रश्न विचारले व या सत्रातून त्यांना स्वतःच्या आरोग्याविषयी आत्मविश्वास प्राप्त झाला.
रोटरी क्लब ऑफ खोपोली अशा उपक्रमांद्वारे समाजआरोग्य व मुलींच्या सक्षमीकरणासाठी आपली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली असून हा उपक्रम रोटरीच्या ‘युनाइट फॉर गुड’ या ब्रीदवाक्याशी सुसंगत असल्याचे रोटरी क्लब ऑफ खोपोलीचे अध्यक्षा सुनिता चव्हाण यांनी बोलताना सांगितले.







