विनाकारण फिरणार्‍यांची अँटिजेन टेस्ट

आंबेत | वार्ताहर |

जिल्ह्यातील कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. वाढलेला रुग्णदर कमी करण्यासाठी शहर व ग्रामीण भागात अनावश्यक घराबाहेर फिरणार्‍या नागरिकांची कोरोना तपासणी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिल्या. 15 दिवसांत गाव कोरोनामुक्त करणारी ग्रामसमिती व सरपंचाचे विशेष प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार असल्याचेही चौधरी यांनी सांगितले.

यावेळी आरोग्य विभागाकडून आंबेत परिसरातील विनाकारण फिरणार्‍या तसेच बाजार पेठेतील दुकानदारांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली. आंबेत पोलीस चेक पोस्टचे पोलीस कॉन्स्टेबल गणेश पवार यांनी परिसरात घरोघरी जाऊन आपली टेस्ट करून घेण्याचे आवाहन केले, त्यामुळे परिसरातील खबरदारी आणि वाढती रुग्णसंख्या टळण्यास मदत होणार आहे. यावेळी आशा सेविका, आरोग्य सेवक मंगेश चव्हाण यांच्यामार्फत आंबेत चेक पोस्ट परिसरात अँटिजेन टेस्ट करण्यात आली.

Exit mobile version