व्हेंचर फाऊंडेशनतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

ठाणे

कोर्लई

ता.11(राजीव नेवासेकर) पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील विरार(पुर्व)-खैरापाडा येथे व्हेंचर फाऊंडेशन तर्फे संस्थापक अध्यक्ष विक्रांत राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.कोरोना रोगाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या अटि नियम व शर्तीचे पालन करण्यात येऊन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

व्हेंचर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विक्रांत राऊळ, महाराष्ट्र संयुक्तसचीव नंदकुमार बंड,प्रभुलाल सुतार,भरतराज यादव,साहिल माहिमकर (वसई),रवि पाडवी (विरार),खलिल पठाण (वसई),तज्ञ डॉ.मोयिम खान आदी. मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी तज्ञ डॉ.मोयिम खान व त्यांच्या टिमने वसई पूर्व  विरार खैरापाडा भागातील लोकांची आरोग्य तपासणी केली.यामध्ये ताप, मधुमेह,रक्तदाब व साधारण तपासणी करण्यात आली.यावेळी व्हेंचर फाऊंडेशन तर्फे रुग्णांना मोफत औषध वाटप करण्यात आले.याचा आजुबाजुच्या परिसरातील रुग्णांनी लाभ घेतला.

गेल्या पाच वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग असलेल्या व्हेंचर फाऊंडेशनचा संपूर्ण भारतात विस्तार करण्यात येणार येणार असून सदस्य नोंदणी प्रगतीपथावर आहे.देशात एक हजार आरोग्य शिबिराचे उद्दिष्ट असून आतापर्यंत साठहून अधिक शिबिरे घेण्यात आली आहेत.शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या पुस्तके वाटप,फी मध्ये सवलत, गोरगरिबांना औषधे तसेच वकिलामार्फत कायदे विषयक प्रश्न सोडविण्यात प्रयत्नशील राहणार असल्याचे विक्रांत राऊळ यांनी यावेळी सांगितले.

Exit mobile version