। सुकेळी । वार्ताहर ।
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा नागोठणे जवळच असलेल्या ऐनघर ग्रामपंचायतीमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. ऐनघर ग्रामपंचायतीच्या सरपंच कलावती कोकळे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.
संपुर्ण देशावर कोरोनाचे सावट असतानाही अनेक शिवभक्तांनी शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहमय वातावरणात पार पडला. नागोठणे जवळील ऐनघर ग्रामपंचायतीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त ऐनघर ग्रामपंचायतीच्या सरपंच कलावती कोकळे यांच्या हस्ते रविवारी श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवप्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. त्यानंतर ऐनघर ग्रामपंचायतीच्या प्रांगणात गुढी ऊभारुन झाल्यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करुन महाराष्ट्रावर व शिवाजी महाराजांवर असणारे प्रेम या गायनातुन व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमाला ऐनघर ग्रामपंचायतीच्या सरपंच कलावती कोकळेे, उपसरपंच मनोहर सुटे, सदस्य किशोर नावळे, प्रकाश डोबळे, राजेंद्र कोकळे, जितेंद्र धामणसे, विठ्ठळ इंदुलकर, जगन कोकळे, लक्ष्मण मोहीते, ग्रामपंचायत कर्मचारी उत्तम जाधव, सुरेश सुटे जोत्स्ना दळवी आदी उपस्थित होते.