सातार्‍यात पेट्रोलची पाईपलाईन फोडली

सातारा

। सातारा । वृत्तसंस्था ।

सातारा जिल्ह्यातील सासवड गावातील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सासवड येथील गावात पेट्रोलची पाईपलाईनच फोडल्याचं समोर आले आहे. एका बाजूला पॅट्रोलचे दर गगनाला भिडले असताना दुसरीकडे मात्र चोरट्यांनी अशा पद्धतीने केलेली चोरी म्हणजे सातारा पोलिसांना दिलेले मोठे आव्हानच म्हणावे लागणार आहे. सातार्‍यातील सासवड येथे आठ दिवसांपूर्वीची ही घटना आता समोर आली असून ही घटनेचे गांभीर्य लक्षात घेतो ती गोपनीय ठेवण्यात आली होती.

हिंदुस्तान पॅट्रोल लिमिटेडने मुंबंई ते सोलापूर अशी पेट्रोलची पाईपलाईन केली आहे. ही पाईपलाईन सातार्‍यातील फलटण तालुक्यातील सासवड आदर्की अशा डोंगराळ भागातून नेण्यात आली आहे. ही पाईपलाईन आज्ञात चोरट्यांनी ड्रील करुन त्याला पाईप लावून ती बाहेर काढली. चोरट्यांनी हजारो लिटर पेट्रोल चोरुन नेले. चोरट्यांनी पेट्रोल चोरी केली मात्र ही चोरी करत असताना त्यांना काढलेली पाईप पुन्हा जोडता आली नाही.

त्यामुळे त्यातून हजारो लिटर पॅट्रोल हे परिसरात मुरत गेले. आणि या परिसरातील संपूर्ण शेती ही जळून गेली. परिसरात पेट्रोलचा वास येत होता मात्र तो नेमका कुठून येतो हे शेतकर्‍यांना समजले नाही. परिसरातील लोकांना मात्र या वासाचा मोठा त्रास जाणवत असताना हिंदुस्तान पेट्रोलियमचे कर्मचारी अधिकारीही शोध घेत या परिसरात फिरत होते. अखेर त्यांना ज्या ठिकाणी ही चोरी झाली आहे ते ठिकाण मिळून आले. जेव्हा पाहिले तेव्हा मोठ्या प्रमाणात पेट्रोल वाया चालल्याचे निदर्शनास आले. त्यांनी वेळीच पोलिसांना या बाबतची माहिती देत संपूर्ण परिसराला धोकादायक परिसर म्हणून सील केले.

Exit mobile version