काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यातर्फे कोविड संकटकाळासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 25 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश तहसीलदार जयराज सुर्यवंशी यांच्याकडे युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष महेश कदम, चिपळूण शहराध्यक्ष फैसल पिलपिले व तालुका उपाध्यक्ष रुपेश आवले यांनी दिला.