। अलिबाग । वार्ताहर ।
वाहन चालकांच्या हयगयीपणामुळे अपघातांचे प्रमाण वाढीस लागले असून नागोठणे येथील अपघातात एकजण ठार झाला आहे. रिलायन्स टाउनशिप गेटसमोर पेझारी नागोठणे रोडवर, आरोपी रा.बेणसे, ता.पेण याने त्याचे ताब्यातील मोटारसायकल क्र.एम एच-06 बीएच/6624 ही अतिवेगाने चालवून पेझारी बाजुकडे जाणारी बुलेट मोटारसायकल क्र.एमएच-06 बीआर/9394 ला ठोकर मारून अपघात केला. या अपघातात बुलेट चालक हिराचंद्र चांगु कुथे (वय 52) रा.मुढांणी, ता.पेणहे मरण पावले आहेत.
याबाबत नागोठणे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागोठणे येथील अपघातात 1 ठार
