कोरोनाचे बंधन…तरीही रायगडकर करणार 1 लाख गणेशमुर्तींना वंदन

जिल्ह्यात 1 लाख 185 घरगुती तर 285 सार्वजनिक गणरायाची होणार प्रतिष्ठापना
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

सलग दुसर्‍या वर्षीच्या कोरोनाच्या सावटात देखील बाप्पाच्या पाहुणचारात काही कमी राहायला नको, यासाठी घरोघरी स्वागताच्या तयारीची लगबग पाहायला मिळते आहे. रायगडात या वर्षी सार्वजनिक व घरगुती 1 लाख 182 गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. या वर्षी अगदी साधेपणात गणेशोत्सव साजरा होत असला तरी गणेशभक्तांचा आनंद मात्र तसूभरही कमी झालेला नाही.रायगड पोलिसांच्या कार्यक्षेत्रात यंदा 285 सार्वजनिक गणपती तर 1 लाख 285 घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

गणेश चतुर्थीला 10 सप्टेंबर रोजी कर्जतमध्ये 26 सार्वजनिक व 5501 घरगुती, नेरळ 6 सार्वजनिक व 3437 घरगुती तर माथेरान 3 सार्वजनिक 120 घरगुती, खालापूर 7 सार्वजनिक व 2 हजार 25 घरगुती, खोपोलीमध्ये 37 सार्वजनिक, 3 हजार 76 घरगुती तर रसायनी सार्वजनिक 21 व 2 हजार 286 घरगुती गणपती विराजमान होणार आहेत.मुरुडमध्ये सार्वजनिक एकही गणपती नसून, 5 हजार 156 घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

पेण पोलीस ठाणे हद्दीत 14 सार्वजनिक, 5,715 घरगुती गणपती, वडखळ 5537 घरगुती गणपती तर दादर सागरी पोलीस ठाणे हद्दीत 2 सार्वजनिक, 3383 घरगुती, पोयनाड पोलीस ठाणे हद्दीत 12 सार्वजनिक, 5390 घरगुती, अलिबागमध्ये 9 सार्वजनिक, 3956 घरगुती, मांडवा सागरी पोलीस ठाणे हद्दीत 1 सार्वजनिक व 3586 घरगुती तर रेवदंड्यामध्ये 2 सार्वजनिक व 6 हजार 453 घरगुती. महाड शहरात सार्वजनिक 30 व घरगुती 2555, महाड तालुका हद्दीत 8 सार्वजनिक व 1963 घरगुती, महाड एमआयडीसी परिसरात 21 सार्वजनिक, 1225 घरगुती पोलादपूर 7 सार्वजनिक 1810 घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना होणार आहे.तळामध्ये एकही सार्वजनिक गणपती नाही तर 4198 खाजगी गणपती आहेत. रोहा पोलीस ठाणे हद्दीत 5 सार्वजनिक व 2 हजार 614 घरगुती, नागोठणेत 13 सार्वजनिक व 2 हजार 15 घरगुती गणपती बसविले जाणार आहेत.

पालीमध्ये 13 सार्वजनिक व 4232 घरगुती, कोलाडमध्ये 10 सार्वजनिक व 1922 घरगुती गणपती, माणगाव पोलीस ठाणे हद्दीत 18 सार्वजनिक व 8698 घरगुती, गोरेगाव 14 सार्वजनिक व 1731 घरगुती गणपती. श्रीवर्धन 4 सार्वजनिक व 4283 घरगुती गणपती, म्हसळ्यात 1 सार्वजनिक व 2505 घरगुती, दिघी पोलीस ठाणे हद्दीत 1 सार्वजनिक व 4525 घरगुती गणपती बसविले जाणार आहेत.

Exit mobile version