1 हजार 932 नवे रुग्ण; एकाचा मृत्यू
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात मंगळवार दि. 11 जानेवारी रोजी कोरोनाच्या 1 हजार 932 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 830 रुग्ण कोरोनामुक्त झाले. सद्यस्थितीत 10 हजार 273 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
मंगळवारी पनवेल महापालिका हद्दीत 1 हजार 242, पनवेल ग्रामीण 213, उरण 27, खालापूर 69, कर्जत 50, पेण 144, अलिबाग 53, माणगाव 48 रोहा 25, श्रीवर्धन 8, म्हसळा 3, महाड 49 तर पोलादपूर 1 असे 1 हजार 932 रुग्ण आढळले. तसेच मुरुड, तळा, सुधागड या 3 तालुक्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 84 हजार 986 झाली आहे. यापैकी 1 लाख 70 हजार 117 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 596 वर गेला आहे. सद्यस्थितीत 10 हजार 273 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.







