आधी वडिल नंतर मामानेही केले लैंगिक शोषण
| अकोला | वृत्तसंस्था |
अकोला जिल्ह्यातल्या हिंगणा तामसवाडी गावात एका 10 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. मुलीला नातेवाईकांकडे ठेवून आई वडील बाहेर गेले असताना याच संधीचा फायदा घेत पीडित मुलीचा दूरचा नातेवाईक असल्याचे यश गवई याने तिच्यावर बळजबरी अत्याचार केला. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच पोलीसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. दुसरीच्या वर्गात असल्यापासून वडील अत्याचार करत असल्याची माहिती पीडित मुलीने दिली. सद्यस्थितीत अत्याचार करणारा दूरचा नातेवाईक आणि वडील हे दोघेही अटकेत आहेत. दरम्यान, अत्याचार करणाऱ्या वडील आणि नात्यातील मामावर कठोर शिक्षा व्हावी.